बांधकाम साइटवरून अडीच लाखांचे प्लंबिंगचे साहित्य चोरीला

0
328

मोशी, दि. २७ (पीसीबी) – बांधकाम साइटवरून दोन लाख 46 हजार रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरीला गेले. ही घटना 9 ऑगस्ट रोजी सकाळी आळंदी रोड मोशी येथे उघडकीस आली.

राज चंदुलाल पटेल (वय 26, रा. चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 26) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मोशी आळंदी रोड मोशी येथे वंडरनेस नावाची बांधकाम साईट सुरू आहे. त्या साइटवर फिर्यादी यांनी प्लंबिंगचे साहित्य ठेवले आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दोन लाख 46 हजार रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.