बांधकाम व्यावसायिकावर पावणे सहा कोटींचे नुकसान केल्याच्या गुन्हा

0
295

मावळ, दि. 07 (पीसीबी) – कारारनाम्यानुसार बांधकाम न करून देता तब्बल पावणे सहा कोटींचे नुकसान केल्याचा गुन्हा देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.हा सारा प्रकार 19 सप्टेंबर 2016 पासून सुरू होता.

याप्रकरणी अभिमन्यू एकनाथ काळोखे (वय 48 रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तुषार सत्यविजय हेड ( वय 42 रा.दापोडी) व महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तुषार खेडा याच्या कस्तुरी डेव्हलपर्स यांच्यात 2016 साली विकसन करारनामा झाला होता. मात्र तेंव्हा पासून आजपर्यंत करारनाम्यानुसार विकास न करता त्यातील अटींचा आरोपीने भंग केला आहे. फिर्यादीच्या फसवणूक करत फिर्यादीच्या 32 प्लॉट चे 5 कोटी 76 लाख रुपयांचे नुकसान केले आहे.याबाबत आरोपीला विचारणा केली असता उलट धमकी देत असल्याने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.