हिंजवडी, दि. ५ (प्रतिनिधी)
बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबर २०२४ रोजी हिंजवडी येथे घडली. बांधकाम व्यावसायिकाने संबंधित व्यक्तीला पैसे परत पाठवण्यास सांगितले. मात्र त्याने पैसे परत न पाठवता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली.
याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एस कवलजोत ट्रेडिंग कंपनीचे मालक गुरपाल लालसिंग सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ऑफिस मधील सर्वर डाऊन झाले. काही वेळाने त्यांचे सर्वर सुरु झाले. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्या खात्यावरून चार लाख ८० हजार रुपये एम एस कवलजोत ट्रेडिंग कंपनीचे मालक गुरपाल लालसिंग सिंग यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाले होते. फिर्यादी यांनी सिंग यांच्याशी संपर्क करून पैसे परत पाठवण्यास सांगितले. मात्र पैसे परत न पाठवता त्यांची फसवणूक करण्यात आली.