वाकड , दि.२९ (पीसीबी) – बांधकाम व्यवसायिकाची खोटी सही व अंगठे तयार करून फ्लॅटचे परस्पर विक्री करत त्या बदल्यात साडेबारा लाख स्वीकारून बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार बारा मे 2023 रोजी वाकड येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला आहे.
याप्रकरणी हनुमंत शंकर भिलारे (वय 41राहणार थेरगाव) यांनी बुधवारी(दि.28) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नितीन उर्फ दत्तात्रय चिंधू कलाटे (वय 36 राहणार वाकड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीची खोटी सही अंगठे व घोषणापत्र तयार करून वाकड येथील सर्वे नंबर 186 मधील द ऑनेक्स या प्रोजेक्टमधील फ्लॅट क्रमांक 803 हा श्रीकांत संजय जाधव यांना बनावट कागदपत्राच्या आधारे 69 लाख 89 हजार रुपयांना विकला त्याबद्दल आरोपीने साडेबारा लाख रुपये घेत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त तयार करून घेतले. यावरून फिर्यादी, खरीदार तसेच शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.