बहुजन महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही – जयंत पाटील

0
311

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची आज पुणे येथे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र हे राज्य दिशादर्शक असून पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे ,असे नमूद करत त्यांनी वरील प्रतिपादन केले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर , कामगार नेते काशिनाथ नखाते, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर,,मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव , गिरीश वाघमारे, नरेंद्र बनसोडे, आनंदा कुदळे, विश्वनाथ जगताप, हौसराव शिंदे आदी उपस्थित होते .

अजित गव्हाणे यांनी घटनेची माहिती दिली . यावेळी पाटील म्हणाले की याबाबत पिंपरी चिंचवड ने सुरु केलेले हि समिती व हे कार्य राज्यव्यापी करणे बाबत लवकरच बैठक आयोजित करावी व आम्हा सर्वांना बोलवून आपण एकत्रित रित्या राज्यव्यापी काम करू अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेले आपले हे काम राज्यात गती घेणार याची सुरुवात झाली आहे . महापुरुषांचा अवमान ज्या ज्या वेळी होईल त्या त्या वेळी महाराष्ट्रातील जनता त्यांना जागा दाखवेल याचा विश्वास वाटतो.