बस स्टॉपवर थांबलेल्या तरुणीचा विनयभंग

0
297

निगडी, दि. ३ (पीसीबी) – एका तरुणाने बस स्टॉपवर थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) निगडीतील टिळक चौक येथील बस स्टॉपवर घडली.

दशरथ मंगलसिंग साबळे (वय 26 रा.नांदेडगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बस स्टॉपवर थांबल्या असताना आरोपी तेथे आला व त्याने अचानकपणे फिर्यादीचा हात पकडून ओढले व त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करत मारहाण देखील केली. माझ्या सोबत आली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.