बस प्रवासादरम्यान महिलेचे दागिने व रोख रक्कम चोरीला

0
142

पीएमटी बस मधून प्रवास करत असताना महिलेचे पर्स हे चोरीला गेली आहे ही चोरी 9 मे 2024 रोजी स्वारगेट ते चिंचवड या बस प्रवासादरम्यान चोरीला गेली आहे.

याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि.14) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अज्ञात चोरट्या विरोधात चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही स्वारगेट ते चिंचवड असा पीएमटी प्रवास करत होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या ताब्यातील लेडीज पर्स चोरली. त्यामध्ये 3 हजार रुपये रोख व 25 हजार रुपयांचे सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तसेच इतर महत्त्वाच्या बँकेची कागदपत्रे होती. यावरून चिंचवड पोलीसानी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.