बस प्रवासादरम्यान महिलेची अडीच तोळ्यांची पाटली लंपास

0
224

निगडी, दि. ०३ (पीसीबी) – निगडी ते आकुर्डी यादरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असलेल्या एका महिला प्रवाशाची अडीच तोळ्यांची सोन्याची पाटली चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. 2) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निगडी पवळे ब्रिज येथून खंडोबा माळ चौक आकुर्डी यादरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. या प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या हातातील अडीच तोळे वजनाची 70 हजार रुपये किमतीची एक सोन्याची पाटली चोरून नेली. आकुर्डी येथे आल्यानंतर महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.