बस प्रवासादरम्यान दोन लाखांचे दागिने चोरीला

0
454

पिंपळे गुुरव, दि. १८ (पीसीबी) – पिंपळे गुरव ते पाईट असा बस आणि खाजगी वाहनाने प्रवास करत असताना एका महिलेच्या बॅग मधून दागिन्यांची लहान बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यात दोन लाख १० हजारांचे दागिने होते. ही घटना बुधवारी (दि. १५) दुपारी दोन ते पाच या कालावधीत घडली.
याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपळे गुरव ते पाईट असा बसने व खाजगी वाहनाने प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगमधील दोन लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली लहान बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.