बस प्रवासात महिलेच्या पर्समधून 87 हजारांचे दागिने चोरीला

0
342

पुणे,दि.०२(पीसीबी) – अहमदनगर ते पुणे आणि पुणे ते वाकड असा बस प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून 87 हजारांचे दागिने चोरीला गेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) घडली.

कमल दिनकर बावधनकर (वय 55, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी बारा वाजता अहमदनगर येथून पुणे येण्यासाठी निघाल्या. पुणे येथून त्या मनपा ते डांगे चौक या पीएमपी बसने घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी त्यांची पर्स बघितली असता त्यात त्यांचे 87 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.