बस प्रवासात महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी पळवली

0
193

निगडी, दि. २३ (पीसीबी) : पीएमपी बस मधून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने एका महिलेच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे ब्रिज येथे घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळील बस स्टॉपवरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने फिर्यादी यांच्या हातातील ७० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.