बस प्रवासात प्रवासी महिलेचा लॅपटॉप पळवला

0
223

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) -बस ने प्रवास करत असताना जेवणासाठी बस थांबल्यानंतर बसमधून उतरलेल्या महिलेचा लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 13) अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे घडली.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला काम करत असलेल्या कंपनीने त्यांना वापरण्यासाठी लॅपटॉप दिला आहे. तो घेऊन फिर्यादी वल्लभनगर पिंपरी ते अहमदनगर मार्गावर बसने प्रवास करत होत्या. बस सुपा येथील गंगासागर हॉटेलवर जेवणासाठी थांबली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा लॅपटॉप हा बॅगेत ठेवून बॅग बसमधील रॅकवर ठेवली. अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि 500 रुपये किमतीची लॅपटॉप बॅग चोरून नेली. फिर्यादी महिला जेवण करून बस मध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.