बस प्रवासात प्रवाशाचा कापला खिसा; रोख 90 हजार रुपये चोरीला

0
286

मोरवाडी ,दि. ५ (पीसीबी) – बसमधून प्रवास करत असताना एका नागरिकाचा खिसा चोरांनी कापला. यामध्ये चोरांनी तब्बल रोख 90 हजार रुपये चोरून नेले आहेत. हि घटना रविवारी (दि.3) एम्पायर इस्टेट बस स्टॉप ते मोरवाडी या प्रवासा दरम्यान घडली आहे.

दत्तात्रय सोपान भोसले (वय 51 रा. हिंगणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बसमधून काळभोरनगर ते दांडेकर पूल असा बस प्रवास करत होते. यावेळी बसमध्ये कोणीतरी त्यांच्या पँन्टचा खिसा कापला. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून 90 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.