कासारवाडी, दि. १० (पीसीबी) – पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेच्या पर्समधील एक लाख 99 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी पिंपरी चौक ते नाशिक फाटा कासारवाडी या दरम्यान घडली.
याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची बहीण सहा दोघी निगडी ते वाघोली या ई-बस मधून प्रवास करत होत्या. दोघीजणी पिंपरी चौकातून बसमध्ये चढल्या. त्या नाशिक फाटा येथे उतरल्या असता त्यांच्या पर्समधून एक लाख 99 हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.