बस प्रवासात दागिन्यांची पर्स चोरीला

0
155

चाकण, १८ जुलै (पीसीबी) – बस प्रवासात एका तरुणाच्या बॅगेतून दागिने असलेली पर्स चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) सकाळी पावणे अकरा ते पावणे बारा वाजताच्या कालावधीत खेड ते आंबेठाण चौक दरम्यान घडली.सोन्याबापू रमेश शेटे (वय 28, भोसरी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थेटे हे बुधवारी खेड ते आंबेठाण चौक दरम्यान बस मधून प्रवास करत होते. प्रवासात दोन अनोळखी महिलांनी थेटे यांच्या बॅगमधून 74 हजार 500 रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.