बस प्रवासात एक लाख 11 हजारांचे दागिने चोरीला

0
235

भोसरी , दि. 2९ – काळेवाडी ते लांडेवाडी या दरम्यान बस प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून एक लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. ही घटना 21 जून रोजी घडली.

याप्रकरणी काळेवाडी येथील 38 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 21 जून रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथून लांडेवाडी येथे बसने गेल्या. त्यानंतर त्या एका हॉस्पिटल मध्ये गेल्या. या दरम्यान त्यांच्या पर्स मधून एक लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.