भोसरी, दि. २८(पीसीबी) -बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी चोरट्याने प्रवासी महिलेच्या पर्समधून 21 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेतीन वाजता पीएमटी बस थांबा, भोसरी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना भोसरी येथून मंचर येथे जायचे होते. त्या भोसरी येथील पीएमटी बस थांब्यावर थांबल्या. अकोला-पुणे या बसमध्ये त्या चढत असताना अज्ञाताने त्यांच्या पर्समधून 10 लाख 75 हजार रुपये किमतीचे 21.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.













































