बसमधून सात लाखांचा ऐवज चोरीला

0
50

शिरगाव, दि. 07 (पीसीबी) : निपाणी ते ठाणे असा बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने बसमधून सात लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. ५) पहाटे एक ते साडेसहा वाजताच्‍या सुमारास सोमाटणे गावच्‍या हद्‌दीत घडली.

सचिन भीमराव शेवाळे (वय ३३, रा. कळवा, ठाणे) यांनी मंगळवारी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी सचिन शेवाळे हे कर्नाटकमधील निपाणी ते ठाणे असा वैभव ट्राव्‍हर्ल्स (जीए ०३ व्‍ही ७२५४) या बसने प्रवास करीत होते. सोमाटणे गावच्‍या हद्‌दीत एक्‍स्‍प्रेस वेवर अज्ञात चोरट्याने त्‍यांच्‍याकडील १६.८ तोळे वजनाचे सहा लाख ९२ हजार रुपयांचे सोन्‍याचे दागिने व आठ हजार ५०० रुपये रोख रक्‍कम असा एकूण सात लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.