बसची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

0
484

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – बसची वाट पाहत थांबलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी साडेसात वाजता लांडेवाडी भोसरी येथे घडली.

प्रदीप महादेव कांबळे (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सकाळी साडेसात वाजता लांडेवाडी भोसरी येथील फिलिप्स बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातून पाच हजारांचा मोबाईल फोन हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.