वाहनाला ओव्हरटेक करताना बसणे एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर वाकी गावात घडली.
भीमा शिवराम बारणे (वय 70, रा. दोंदे, ता. खेड), लक्ष्मीबाई भीमा बारणे अशी जखमींची नावे आहेत. भीमा बारणे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बस (एमएच 20/जीसी 4502) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून खेडकडे जात होते. ते वाकी गावच्या हद्दीत समाधान खानावळच्या पुढे आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने एका वाहनाला ओव्हरटेक करताना बारणे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये बारणे दांपत्य गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.










































