दि . १३ ( पीसीबी ) – कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात होता. आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीने आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. विशाल गवळीने गळफास घेत पहाटे आत्महत्या केली.