बनावट स्पेअर पार्ट विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा

0
225

होंडा कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्या प्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास क्रांतिवीर नगर, थेरगाव येथे करण्यात आली.

गोविंद वनाराम सिरवी (वय 30, रा. काळेवाडी. मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी रेवणनाथ विष्णू केकान (वय 41, रा. हडपसर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरवी यांचे थेरगाव येथे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. त्यांनी दुकानात होंडा मोटार सायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्रीसाठी ठेवले. त्यासह होंडा नावाचे प्लास्टिक स्टीकर देखील दुकानात ठेवले. बनावट स्पेअर पार्ट खरे असल्याचे ग्राहकांना सांगून त्याची विक्री केली. याबाबत कंपनीला माहिती मिळाल्यानंतर कंपनीकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन लाख 49 हजार 741 रुपये किमतीचे स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.