बनावट सर्च रिपोर्ट बनवून महिलेची फसवणूक

0
433

पिंपळे गुरव, दि. २३ (पीसीबी) – फ्लॅटचा बनावट सर्च रिपोर्ट तयार करून तिघांनी एका महिलेची फसवणूक केली. त्यानंतर त्याच फ्लॅटचे विनासंमती खरेदीखत करून फसवणूक केली. ही घटना ८ जून २०२० ते २१ जून २०२२ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

राहुल जालिंदर माने (रा. पिंपळे गुरव), एक महिला, अॅड. प्रशांत विश्वनाथ पानसरे (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल आणि प्रशांत यांनी संगनमत करून राहुल याची पिंपळे गुरव येथील फ्लॅट फिर्यादी यांनी खरेदी करावा यासाठी बनावट सर्च रिपोर्ट तयार केला. आरोपींनी तयार केलेल्या सर्च रिपोर्टवर फिर्यादी यांनी विश्वास ठेऊन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला पैसे दिले. त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या परस्पर त्या फ्लॅटचे विनासंमती खरेदीखत करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.