बनावट व्हिसा बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल

0
333

वाकड , दि. २८ (पीसीबी) – दहा जणांचे बनावट व्हिसा बनविल्या प्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक ऑक्टोबर 2023 ते 27 जानेवारी 2024 या कालावधीत ब्ल्यू ओशन मरीन कंपनी, भुमकर चौक, वाकड येथे घडला.

मनीष कन्हैयालाल स्वामी (वय 32, रा. राजस्थान) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्ल्यू ओशन मरीन कंपनी, भूमकर चौक, वाकड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वामी यांचा विश्वास संपादन करून ब्ल्यू ओशन मरीन कंपनीने स्वामी आणि त्यांच्या 19 मित्रांना बाहेर देशाचा व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी स्वामी यांच्याकडून 19 पासपोर्ट कुरियर द्वारे मागवून घेतले. ब्रुनेई देशात जाण्यासाठी दहा जणांना बनावट व्हिसा बनवून त्यावर बनावट शिक्के व मोहर उमटवून ते फिर्यादी यांच्या व्हाट्सअप वर पाठवून ते खरे असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी स्वामी यांच्याकडे कंपनीने पैशांची मागणी करत फसवणूक केली असल्याचे फिर्यदित म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.