बनावट विदेशी कॉस्मेटिक उत्पादने विकणाऱ्या पिंपरीतील क्रिष्णा कॉस्मेटिक व्यावसायिकावर गुन्हा

0
146

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी,  – बनावट विदेशी कॉस्मेटिक उत्पादन करून ते एका प्रतिथयश कंपनीच्या नावाने विक्री केल्या प्रकरणी एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 31) सायंकाळी रिव्हर रोड, पिंपरी येथील क्रिष्णा कॉस्मेटिक या दुकानात घडली.

वीरेंद्र रामलखन यादव (वय 40, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप हरीश गिडवानी (वय 41, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यादव याचे रिव्हररोड, पिंपरी येथे क्रिष्णा कॉस्मेटिक हे दुकान आहे. त्याने त्याच्या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कॉस्मेटिक बनवले. फिर्यादी गिडवानी यांच्या मालकीच्या फ्लोराएक्टीव्ह कोमर्सिओ दि कॉस्मेटिक या नावाने आरोपीने त्याची उत्पादने विक्रीचा व्यवसाय केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.