बनावट वस्तू विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

0
77

वाकड, दि. 25 (पीसीबी) : बनावट वस्तू विक्री केल्याप्रकरणी वाकड मधील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) सायंकाळी काळाखडक येथे करण्यात आली.

पुनाराम अचलाजी चौधरी (वय 38, रा. थेरगाव), भोमाराम रामनिवास चौधरी (वय 32, रा. काळाखडक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी साजिद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनाराम चौधरी यांचे काळाखडक रोडवर ईश्वर सुपर मार्केट हे दुकान आहे. तर भोमाराम चौधरी यांचे काळाखडक रोड येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी फिर्यादी अन्सारी यांच्या कंपनीच्या बनावट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत सात हजार 101 रुपये किमतीच्या बनावट वस्तू जप्त केल्या. पुनाराम चौधरी आणि भोमाराम चौधरी यांना पोलिसांनी समजपत्र दिले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.