बनावट वस्तू विक्रीला ठेवल्या; पोलिसांनी माहिती मिळताच….

0
86

देहूरोड, दि. ०३ (पीसीबी) : बनावट वस्तू विक्री प्रकरणी देहूरोड येथील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 31) सकाळी करण्यात आली.

नेनाराम चेतनराम चौधरी (वय 26, रा. विकास नगर देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी साजिद अन्सारी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेनाराम चौधरी याने त्याच्या दुकानामध्ये बनावट हार्पिक टॉयलेट, लायझॉल असे विक्रीसाठी ठेवले. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी 55 हजार 604 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.