बनावट लोगो लावून कपडे विक्री करणाऱ्यास अटक

0
297

वाकड, दि. १२ (पीसीबी) – कपड्यांवर वेगवेगळ्या ब्रँडचे लोगो आणि लेबल लावून त्याची विक्री केली. यामध्ये मूळ कंपन्यांच्या कॉपीराईट अधिकाराचे उल्लंघन केल्याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8) दुपारी रिझवान ड्रेसेस, नढेनगर काळेवाडी येथे करण्यात आली.

इम्रान युनूस शेख (वय 33, रा. नढेनगर, काळेवाडी), लुधियाना पंजाब येथील शिव भोले फॅशनचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नरेंद्र सिंग (वय 44, रा. दिल्ली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान शेख याने त्याच्या रिझवान ड्रेसेस या दुकानात लेव्हीस्ट्रॉस अँड को, केल्विन क्लेन, आदिदास ए जी, नाइटी इनोव्हेट सी व्ही, अंडर आर्मर, डी के एच रिटेल सुपरड्राय या कंपनीचे बनावट लेबल व लोगोचा वापर करून तयार केलेले कपडे विक्रीसाठी ठेवले. आरोपीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करून आर्थिक फायद्यासाठी कपड्यांची साठवणूक व विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. शेख याने हे कपडे लुधियाना पंजाब येथील शिव भोले फॅशन या दुकानातून आणल्याने शिव भोले फॅशन या दुकानदाराविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.