बनावट बिलांच्या आधारे १४ कोटींचा जीएसटी घोटाळा, वसुली कऱणारी टोळी गजाआड

0
305

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुंबईतील भिवंडी आयुक्तालयाच्या पथकाने इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यासाठी बनावट बिलांच्या आधारे दावे करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४१ कोटींच्या बनावट बिलांच्या आधारे सुरुवातीला १८ कोटींची आयटीसी सापडली आहे. याप्रकरणी एका फर्मच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार म्हणाले की, ही टोळी बनावट जीएसटी चालानद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेण्यात व्यस्त होती. या टोळीशी संबंधित एका फर्मने १४.३० कोटी रुपयांच्या बोगस बिलांद्वारे २.५७ कोटी रुपयांचा आयटीसी घेतला होता. ही बाब समोर येताच कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.

मेसर्स विश्वकर्मा एंटरप्रायझेस असे अटक केलेल्या फर्मचे नाव आहे. त्याने १४.३० कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसवर २.५७ कोटी रुपयांचे आयटीसी मिळवले. CGST कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल CGST कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. भिवंडी सीजीएसटी आयुक्तांनी त्यांची जामिनावर सुटका केली.
हे प्रकरण CGST मुंबई झोनने कर घोटाळेबाज आणि बनावट ITC नेटवर्क विरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरात सीजीएसटी भिवंडीकडून अटक करण्यात आलेली ही १५ वी घटना आहे. पुढील तपास सुरू आहे.