बनावट पार्ट विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल

0
471

निगडी, दि. २९ (पीसीबी) – अशोक लेलँड कंपनीचे बनावट पार्ट विक्रीसाठी दुकानात ठेवल्याप्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे करण्यात आल्या.

दोन्ही प्रकरणांमध्ये रेवननाथ विष्णू केकान (वय 40, रा. हडपसर पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पहिल्या कारवाईमध्ये अरुण शामलाल मित्तल (वय 54, रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण मित्तल याने त्याच्या दुकानात अशोक लेलँड कंपनीचे 2508 रुपये किमतीचे 11 बनावट पार्ट विक्रीसाठी ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात देवप्रकाश रामखिलावन पाल (वय 33, रा. दळवीनगर चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पाल याने देखील त्याच्या दुकानामध्ये 58 हजार 700 रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे बनावट पार्ट विक्रीसाठी ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.