बनावट जामिनदारासह दोघांवर गुन्‍हा

0
104


पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : चॅप्‍टर केसमध्‍ये बनावट जामिनदार देणार्‍यासह दोघांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना पोलीस उपायुक्‍त कार्यालय, चिंचवड येथे घडली.

शुभम अशोक मडिवाळ (वय १९, रा. हडपसर, पुणे), विकास कृष्णा माने (वय २८, रा. माने वस्ती, नांदुरे, पो. जांभुड, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक ओकार सुभाष बंड (वय ३७) यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ नोव्‍हेंबर २०२४ रोजी पोलीस उपायुक्‍त परिमंडळ एकच्‍या कार्यालयात चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी शुभम मडीवाल याने त्याच्या विरोधात सुरू असलेल्या चॅप्टर केसमध्ये खोटा जमिनदार म्‍हणून आरोपी विकास माने यास त्याचा नाव व पत्ता बदलून संतोष मारुती तळेकर (वय ३०, रा. मराठी शाळेशेजारी, निगडी) या नावाने तोतया जामिनदार म्हणून संगनमताने हजर केले. तसेच त्याच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणुक केली.