बनावट कागद पत्रासह पाच बांगला देशी नागरिकांना अटक

0
144

बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशत विरोधी शाखा अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.2) भोसरी येथील शांतीनगर परिसरात केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा (वय 26) राज उर्फ सम्राट सदन अधिकारी (वय 27) जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय 38) वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा (वय 26) आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय 32) या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्रा शिवाय राहत होते. ते बेकायदेशीर रित्या भारतात बनावट आधार कार्ड जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट बनवून राहत होते. याबाबत दशतविरोधी पथकाल याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सिम कार्ड अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.