बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडून बँकेची 47 लाखांची फसवणूक

0
181

बनावट कागदपत्रांच्या आधारे कोटक महिंद्रा बँकेत डिजिटल पद्धतीने खाते उघडून त्याद्वारे बँकेचे क्रेडीट कार्ड आणि पर्सनल लोन काढून बँकेची 47 लाख तीन हजार 948 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 मे 2023 ते 2 मे 2024 या कालावधीत कोटक महिंद्रा बँकेच्या भेळ चौक, निगडी येथील शाखेत घडली.

कोटक महिंद्रा बँकेचे ब्रांच ऑपरेशन मॅनेजर मंगेश मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात लोकांनी अन्य व्यक्तींचे पॅन क्रमांक वापरून आधार कार्ड तयार केले. पॅन कार्ड क्रमांक आणि बनावट आधार कार्डचा वापर करून डिजिटल पद्धतीने कोटक महिंद्रा बँकेत आठ खाती सुरु केली. त्यानंतर आरोपींनी त्या खात्यांवर क्रेडीट कार्ड घेतले. पर्सनल लोन घेतले. ते पैसे परत न करता बँकेची तब्बल 47 लाख तीन हजार 948 रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.