बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

0
258

प्राधिकरण, दि. १० (पीसीबी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे तिघांनी मिळून महिलेची फसवणूक केली. हा प्रकार सन 2007 ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.

सिद्धार्थ विजयेंद्रनाथ कपिल, नर्गिस सिद्धार्थ कपिल, उदित सिद्धार्थ कपिल (सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची निगडी प्राधिकरण आणि ट्रान्सपोर्टनगर निगडी येथील व्यवसायावर हक्क दाखविण्यासाठी आरोपींनी खोटी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यात आरटीओ लायसन्स, आधारकार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्रे तयार करून आरोपींनी फिर्यादी आणि संबंधित विभागाची दिशाभूल व फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.