बनावट कपडे विक्री प्रकरणी दोन दुकानांवर कारवाई

0
30

पिंपरी, दि. 31 (पीसीबी)
पिंपरी कॅम्प परिसरात पिंपरी पोलिसांनी दोन दुकानांवर बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली. यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सायंकाळी करण्यात आली.

चेतन रवी पुजारी (वय २८, रा. कोथरूड), बन्सीलाल रमेशलाल पंजवाणी (वय ४१, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक बाबुलाल पटेल (वय ४६, रा. मालाड वेस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या दुकानांमध्ये अंडर आर्मर ब्रँड कंपनीचे स्वामित्व असलेल्या त्याच नावाचे व चिन्हाचे बनावट टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट विक्री करता ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.