वाकड, दि. 04 (पीसीबी) : बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास छत्रपती चौक, कस्पटेवस्ती, वाकड येथे करण्यात आली. अरुण नरेश शर्मा (वय 38, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र सिंग (वय 37, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण शर्मा याचे कस्पटे वस्ती वाकडी येथे पूर्वी कॅज्युअल्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. त्याने दुकानामध्ये लुईस फिलीप, एलेन सोली, पीटर इंग्लंड, व्हॅन हुसेन कंपनीचे स्टिकर असलेले जीन्स व टी-शर्ट विक्रीसाठी ठेवले. बनावट कपडे विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर कंपनीकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी याबाबत कारवाई करत दोन लाख 63 हजार 230 रुपये किमतीचे बनावट कपडे जप्त केले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.