दि. 19 (पीसीबी) – कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१७ जानेवारी) रात्री धावडे वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.
सुरेशकुमार मणिलाल जैन (चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी कॅस्ट्रॉल कंपनीचे अधिकारी गौरव श्रीवास्तव (३९, मध्य प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन यांनी त्यांच्या जय मंगल एजन्सी या दुकानात कॅस्ट्रॉल कंपनीच्या नावाने बनावट ऑइलची विक्री केली. त्याबाबत कंपनीचे प्रतिनिधी गौरव श्रीवास्तव यांना माहिती मिळाली. त्यांनी भोसरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दुकानात कारवाई करत ५२ हजार ९८ रुपये किमतीचे बनावट ऑइल जप्त केले आहे.