बनावट ऍप द्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत ३३ लाखांची फसवणूक

0
14

बावधन, दि .7 (पीसीबी)
बनावट ऍप तयार करून त्याद्वारे शेअर मार्केट आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यक्तीची ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० मे ते २७ मे २०२४ या कालावधीत बावधन येथे घडली.

याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंत पिरामल, जीएफएसएल सिक्युरिटीजचे अनोळखी एजंट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एक बनावट ऍप तयार केले. त्याद्वारे फिर्यादी यांना शेअर मार्केट आणि आयपीओ खरेदी करण्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केली असता त्यांना त्याचा परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची ३३ लाख ४० हजार ८८५ रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.