वाकड, ता. ७ : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी काळेवाडी, थेरगाव परिसरातून काढलेल्या पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जागोजागी समर्थनाच्या जोरदार घोषणांनी कलाटे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवडमध्ये यंदा बदल हवा असल्याच्या भावना नागरीकांनी कलाटे यांच्याकडे व्यक्त केल्या.
काळेवाडीतील ज्योतिबा मंदिरात नारळ फोडून पदयात्रेला व प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी श्यामराव काळे संजोग वाघेरे, हरिष नखाते, अनिता तुतारे, ज्ञानेश्वर बलशेट्टी, सागर तापकीर, सज्जी वर्गी, चंद्रशेखर जाधव, सुजाता नखाते दिनेश नढे, सचिन लिमकर, गोरख पाटील, ओम क्षीरसागर, अक्षय घोडके यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेतुन थेरगाव परिसरासह ज्योतिबा नगर, विजय नगर, काळेवाडी परिसर पिंजून काढण्यात आला.
‘एकच वादा राहुल दादा’, ‘येऊन येऊन येणार कोण राहुल दादांशिवाय शिवाय आहेच कोण’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी नागरिकांनी विविध समस्यांचे गाऱ्हाणे कलाटेंसमोर मांडून आम्हाला आता चिंचवडमध्ये बदल हवा असून सुसंस्कृत, सुशिक्षित, अभ्यासू आणि आमचे प्रश्न कायमचे सोडविणारा आमदार हवा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान कलाटे यांनी चिंतामणी चौक, वाल्हेकर वाडी येथील मंडप मालक वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी चिंचवड शहराचे अध्यक्ष नितीन गवळी, स्थानिक नागरिक व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते
चौकट/कोट: प्रश्न सोडविल्याच्या केवळ भाकड कथा
कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थासह प्रखर विरोध करून रिकाम्या हाताने परतवून लावण्यात होते. तत्कालीन मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांची वारंवार भेट घेऊन डेपो रद्द करण्याची मागणी मी लावून धरली होती. त्यामुळे पूनावळेकर सुज्ञ आहेत, कचरा प्रश्न कोणी सोडवला हे त्यांना चांगलेच माहिती आहे. विरोधकांनी या प्रश्नावर काय फॉलोअप केला ते दाखवावे. चिंचवडला दहा वर्ष पाणी मिळालं नाही, पुन्हा फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. मला संधी मिळाल्यावर पाणी, रस्ते आणि इतर प्रश्नातून चिंचवडकरांची कायमची मुक्तता करण्याची ग्वाही मी जनतेला दिली आहे.
- राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडी उमेदवार
फोटो ओळ
काळेवाडी : राहुल कलाटे यांच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक व आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते