बदली रद्द न झाल्याने पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा उपोषणाचा इशारा

0
288

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – तात्काळ प्रभावाने झालेली बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एक वरिष्ठ लिपिक उपोषणाला बसणार आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ लिपिकाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

गणेश रामदास सरोदे असे वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. 7 जुलै 2022 रोजी पोलीस अधिकारी आस्थापना एक ते लेखा शाखा येथे तात्काळ प्रभावाने सरोदे यांची बदली करण्यात आली. ही बदली होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील त्यांची बदली रद्द झाली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयात मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या कारभाराविरोधात आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणास बसणार असल्याचे सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘मी पत्र दिल्यानंतर वरिष्ठांनी मला थांबवले आहे. मात्र बदली रद्द न झाल्यास मी उपोषणाला बसणार आहे, असे सरोदे यांनी सांगितले.