बदलापुरातील त्या आरोपीला भर चौकात फाशी द्या , भाजप महिला नेत्यांची मागणी

0
147

दि. २० ऑगस्ट (पीसीबी) बलदापूर,
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात हादरला आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तसेच बदलापुरात रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येत आहे. आता याप्रकरणी भाजपच्या महिला नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, असा संताप भाजपच्या महिला नेत्यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे, असे सांगितले आहे. “बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे”, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

“आरोपीला भर चौकात आणून फाशी द्या” – नवनीत राणा
तर भाजप नेत्या नवनीत राणा यांनीही बदलापूर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर प्रकरणी आरोपीला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केले आहे. बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं, त्यात अशा राक्षसी विचारधारेच्या लोकांना भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे, असे नवनीत राणा यांनी म्हटले.