बदनामी करण्याची धमकी देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार

0
52

केडगाव, दि. 14 (पीसीबी) : बदनामी करण्याची धमकी देवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी २०१८ ते ऑगस्ट २०२४ या काळात शहरातील नवनागापूर व केडगाव उपनगरात वेळोवेळी घडला आहे. या प्रकरणी पीडित तरूणीने १२ डिसेंबर २०२४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुखदेव दिवटे (वय-३४ रा. जय भवानी चौक, निंबळक, ता. नगर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना उपनगरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल दिवटे याची फिर्यादी तरूणीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने सुरूवातीला जानेवारी २०१८ मध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले होते. प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर मी तुझी बदनामी करेल, तसेच जीवे मारेल अशी धमकी दिली होती. त्यानंतर अनिलने वारंवार बदनामी करण्याची धमकी देत फिर्यादीसोबत जानेवारी २०१८ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच फिर्यादीने त्याला विरोध केला असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली होती, असे फिर्यादीत नमूद केलेले आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.