भोसरी, दि. १० (पीसीबी) – पत्नीची बदनामी करणारा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 18 एप्रिल 2018 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हापसा गोवा आणि कासारवाडी पुणे येथे घडला.
पती मयूर शरद शेटगावकर (वय 34), शरद सदू शेटगावकर (वय 76), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती कारणावरून वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. विवाहितेची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून पोस्ट करत मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत









































