बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मधुर बजाज यांचे शुक्रवारी निधन झाले. शुक्रवारी सकाळी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज पहाटे ५ वाजता त्यांचं निधन झालं. दरम्यान, २४ जानेवारी २०२४ रोजी आपल्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.
मधुर बजाज यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण देहरादून येथील प्रतिष्ठित दून स्कूलमधून घेतले, त्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून बी.कॉम. केले. १९७९ मध्ये त्यांनी आयएमडी, लॉसाने (स्वित्झर्लंड) येथून एमबीए पदवी प्राप्त केली. त्यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाने ‘विकास रतन’ पुरस्काराने सन्मानित केले. ते सियाम, एमसीसीआयएचे.माजी अध्यक्ष आणि सीआयआयच्या राष्ट्रीय परिषदेचे सक्रिय सदस्य देखील आहेत.
मधुर बजाज उद्योग आणि सामाजिक उपक्रमांमध्ये खोलवर सहभागी होते. त्यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) चे माजी अध्यक्ष म्हणून काम केले. ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य देखील ( Madhur Bajaj) होते.