बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा ! – श्री. विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ता, विहिंप

0
175

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युल फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटिस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10 लाख रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे, अशी माहिती ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल यांनी दिली. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बजरंग दलावर बंदीच्या मागणीच्या आड ‘पी.एफ्.आय’.ला वाचवायचे काँग्रेसी षड्यंत्र ?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. बंसल पुढे म्हणाले की, आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी हिंदूंना कलंकित करण्याचा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करत आली आहे. बजरंग दलाचे राष्ट्रकार्य अविरतपणे सुरूच आहे. कोरोनाच्या काळात, तसेच विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बजरंग दलाने सेवा कार्य केले आहे. बजरंग दलावर दोषारोपण करून जिहादी संघटना पी.एफ्.आय.ला वाचवायचा जर काँग्रेस प्रयत्न करत असेल, तर ते कधीच सफल होणार नाहीत. भारताची जनता आणि बजरंगबलीचे भक्त काँग्रेसला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या शुभा नाईक म्हणाल्या की, बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने केली असली, तरी कुठल्याही राज्य सरकारला विशिष्ट संघटनेवर बंदी घालण्याचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार नसतो. पी.एफ्.आय.(PFI) वरसुद्धा आम्ही बंदी आणू असे कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे. पी.एफ्.आय.(PFI) वर आधीच केंद्र सरकारने बंदी आणली असतांना कर्नाटक काँग्रेस त्यांच्यावर वेगळी कुठली बंदी आणणार ? काँग्रेस मुसलमानांच्या मतपेटीच्या राजकारणासाठी हे सर्व करत आहे.

‘हिंदु जनजागृती समिती’चे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, बजरंग दल आणि पी.एफ्.आय. यांची तुलनाच होऊच शकत नाही; कारण बजरंग दल राष्ट्रभक्त संघटना आहे, तर पी.एफ्.आय. एक राष्ट्रविरोधी आणि आतंकवादी संघटना आहे. हिंदू संघटनांना बदनाम करणे हा काँग्रेसचा इतिहास राहिला आहे. फक्त बजरंग दलच नव्हे तर यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी अनेक हिंदू संघटनांवर काँग्रेसने बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र जिहादी संघटनावर बंदी आणावी यासाठी काहीच केले नाही. हिंदू समाज आता जागृत होत असून सर्व हिंदू संघटनांच्या सोबत उभा रहाणार आहे.