देहूरोड, दि. २८ (पीसीबी) – बचत गटाचे पैसे जमा करत असताना महिलेच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञाताने मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २६) तळवडे परिसरात घडली.
याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महिला बचत गटाचे पैसे गोळा करत असताना त्यांनी त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी मोबाईल फोन चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.