बंद घरातून 82 हजारांचे साहित्य चोरीला

0
379

चाकण, दि. ३ (पीसीबी) – बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी घरातून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 82 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे दोन ते चार वाजताच्या सुमारास गाडेकरवस्ती, भोसे येथे घडली.

सन्मुख बसय्या स्वामी (वय 34, रा. भोसे, चाकण. मूळ रा. आंदेवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर आतून बंद असताना चोरट्याने घराची आतील बाजूची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातून 65 हजारांचे दागिने, सह हजार रोख रक्कम आणि 10 हजारांचा मोबाईल फोन असा एकूण 82 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.