बंड मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘प्लॅन ऑफ ऍक्शन ‘ तयार ..

0
290

मुंबई, दि.२५(पीसीबी): राज्यात राजकीय असंतोष पसरवणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करून हे बंड मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘प्लॅन ऑफ ऍक्शन ‘ तयार झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.शुक्रवारी संध्याकाळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ही रणनीती ठरवण्यात आली आहे. विधान भवनात बंडखोर आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया कशी पार पाडावी, सध्याचा राजकीय घटनाक्रम अधिकाधिक दिवस लांबवून शिंदे गटावर दबाव कसा वाढवावा, दोन ते तीन बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्यात यश आल्यास शिंदे गटाला जबर धक्का बसून त्यांच्यावरील दबाव वाढवण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे.

दरम्यान, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना विधानसभेच्या सचिवालयाने सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर कायदेशीर मत मागवण्यासाठी पाचारण केले आहे. शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी याचिका सादर केली आहे. यावरही कुंभकोणी यांच्याकडून कायदेशीर मत घेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, शिवसेना खासदार आमदार अनिल देसाई, विनायक राऊत आदी बडे नेते हजर होते.