मुंबई,दि.०७(पीसीबी) – राज्याच्या राजकाणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकला दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली.
खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओकला दाखल झाले. प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली. प्रतिभा पवार यांच्यावर आजच ब्रीज काँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.