बंगल्यात एका स्त्रीला बोलावून दोघांनाही विवस्त्र करून फोटो आणि व्हिडीओ काढले

0
49

पिंपरी, दि. १० (पीसीबी) –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर एका बंगल्यात एका स्त्रीला बोलावून दोघांनाही विवस्त्र करून फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये.

अशोक पवारांच्या मुलाचं अपहरण
अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. सरोदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अपहरण झालेल्या ऋषीराज पवारचा व्हिडीओ दाखवला. ऋषीराजनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर तिथे एका महिलेला बोलवण्यात आले. तिला बेडवर झोपण्यास सांगितले आणि ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. जर प्रतिसाद दिला नाही, तर तुला मारुन टाकू, अशी धमकी मला देण्यात आलीये.

“महिलेला खोलीत आणलं, माझे कपडे काढले”
ठार मारण्याच्या धमकीमुळे आरोपी सांगेल त्याप्रमाणे ऋषीराज यांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी प्रतिसाद दिला. भाऊ कोळपेनं फोटो, व्हिडीओ काढले. या प्रकारानंतर ऋषीराज यांनी हे सर्व कोणी करायला सांगितलं, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आम्हाला पुण्यातील एकाने 10 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं असिम सरोदेंनी सांगितलं.

आरोपीला आपल्या बोलण्यात गुंतवून ऋषीराज यांनी आपला फोन काढला आणि आपल्या कार्यकर्त्यांना मेसेज करून झालेला प्रकार सांगितला. माझ्यासोबत असलेल्या कोळपेला पकडा असं सांगितलं. तेथे गावात गेल्यावर कार्यकर्त्यांनी कोळपेला पकडले. तसेच त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला.